#AUSvIND : बीसीसीआयकडून टीम इंडियाला बोनस जाहीर

ब्रिस्बेन ( INDIA WON ) : ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर 32 वर्षानंतर मिळाविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियाला बोनस जाहीर करण्यात आला आहे. 

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचाच विजयाचा गुलाल; ‘गाबा’वर कांगारूंना लोळवले

या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विजयश्री खेचून आणण्याऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच त्यांना एक भन्नाट गिफ्टही दिले आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच ट्विट करत माहिती दिली. 

गांगुली यांनी ट्विटरवरून भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देत म्हटले की, हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशाप्रकारे मालिका विजय मिळवणे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील, अशा शब्दांमध्ये गांगुली यांनी आनंद व्यक्त केला.

अजिंक्य रहाणेचा साधेपणा; कर्णधार असूनही म्हणाला…

त्यानंतर पुढे त्यांनी बीसीसीआयकडून भारतीय टीमला पाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर केले. खरं तर या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. सर्व सदस्य खूप छान खेळले. अभिनंदन, असेही तो म्हणाला.

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही ट्विटरवरून भारतीय संघाचे कौतुक केले आहे.  शहा यांनी भारतीय क्रिकेटमधला  हा खास क्षण असल्याचे म्हणत भारतीय संघानी दाखवलेल्या  खेळाडूवृत्ती आणि  सर्वोत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.