मुंबई – कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या.
नुकतंच, बिग बॉसच्या घरात दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झालाय. या आठवड्यात घरात ‘जोडी की बेडी’ ही थीम असून, घरातील प्रत्येक सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आहेत. यंदाच्या भरपूर तगडे स्पर्धक घरामध्ये आहेत.
बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे ‘गायत्री दातार’ आणि’ मीरा जगन्नाथ’ यांच्याविषयी सोशल मीडियावर
अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धक मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय. होय.. या स्पर्धकाने घरात आल्यापासूनच स्वतःचा चाहतावर्ग तयार केला आहे. हा स्पर्धक आहे अभिनेता “विशाल निकम’.
विशाल निकमच्या खेळीवर नेटकरी खूश असून सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. टास्कमधील विशालची कामगिरी, सहस्पर्धकांसोबतचं वागणं पाहून तोच अखेरपर्यंत टिकून विजेता ठरेल, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
विशालला सोशल मीडियावर नेटकरी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. तर दुसरीकडे ‘गायत्री दातार’ आणि’ मीरा जगन्नाथ’ या बिग बॉस मधून बाहेर काढा.. अश्या प्रतिक्रिया येत आहे.
असा आहे विशालचा सिनेविश्वातला प्रवास-
27 वर्षीय विशालने टीव्ही आणि चित्रपटविश्वात नाव कमावलंय. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत ज्योतिबांची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतील त्याच्या शिवा काशिदच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.