लिस्बन – चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बायर्न म्युनिकने लियॉनचा 3-0 असा दणदणीत पराभव केला व थाटात अंतिम फेरी गाठली. या फेरीत त्यांचा सामना यंदाच्या स्पर्धेत भरात असलेल्या पॅरिस सेंट जर्मनशी (पीएसजी) होणार आहे.
देशांतर्गत स्पर्धेतून गेल्या 22 वर्षांनंतर या स्पर्धेत पात्र ठरलेल्या दोन संघात होणारी ही पहिलीच अंतिम लढत ठरली आहे. या उपांत्य सामन्यात सर्जी गेनाब्रे याने पहिल्याच हाफमध्ये 18 आणि 33 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावरही लियॉन संघाला एकदाही गोल करण्याची संधी मिळाली नाही. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना भरात असलेल्या रॉबर्ट लेवानोवस्कीने 88 व्या मिनिटाला गोल केला व संघाला 3-0 असा मोठा विजय मिळवून दिला.
पीएसजीने या संपूर्ण स्पर्धेत या सामन्यासह एकूण 25 गोल नोंदवले. लियॉन संघाला गोल करण्याच्या मिळालेल्या दोन संधींचा लाभ घेता आला नाही.