‘आयआरसीटीसी’चे भागभांडवल विक्रीला

नवी दिल्ली – केंद्र सरकार आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड ट्युरिझमचे आपल्याकडील काही भागभांडवल विकण्याच्या विचारात आहे. या वर्षी सरकारने 2.1 लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून उभे करण्याचे ठरविले आहे. या कामावर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला. त्यामुळे आता सरकार ही प्रक्रिया वेगात मार्गी लावण्याच्या विचारात आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने आयपीओ काढून या कंपनीतील आपले भागभांडवल 87.40 टक्‍क्‍यांवर आणले होते. आता सरकार यातील काही भाग विकणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिनकांता पांडे यांनी सांगितले की, बीपीसीएल आणि एअरइंडियाची निर्गुंतवणूक जागतिक विमान सेवावर परिणाम झाल्यामुळे थंडावली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.