तुळशीला“औषधाची राणी’ असं म्हटलं जातं. तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आलेला आहे. आजही हिंदू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून वाचवते. पण तुळशीच्या गुणांबद्दल माहीत असूनही आपण तिचा उपयोग हवा तेवढा करत नाही.
तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानाचं नाही, तर खोड, फुल, बिया या भागांचा ही उपयोग केला जातो. तुळशीचे विविध प्रकार म्हणजे राम तुळस, श्याम तुळस, विष्णू तुळस, रान तुळस, लिंबू तुळस, असे आहेत. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन अ, बी, सी, क, कॅल्शिअम, झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम आहे. तुळशीचं रोप हे सर्व घरात आढळत. पण समोर असून ही अनेकदा याच्या गुणांकडे थोडं दुर्लक्षच होतं.
1. कोणत्याही प्रकारच्या स्किन इन्फेकशनला रोखण्यासाठी तुळशीपेक्षा चांगली औषधी नाही. तुळशीची पान अँटीबॅक्टरीअल असतात. तुळशीची पेस्ट बनवून स्किनवर लावावी.
2. तुळस सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
3. अनियमित किंवा उशिरा येणाऱ्या पीरिअड्सची समस्या असल्यास तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास फायदा होतो.
4. पोटात जळजळ, पोटदुखी गॅस आदी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.
5. ताजी तुळशीची पानं रोज सकाळी चघळावी. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. ज्यामुळे आपलं आजारी पाडण्याचं प्रमाण खूप कमी होतं.
तुळस कशी खावी : तुळशीच्या पानांना खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ती पानं चघळून किंवा त्याचा रस, काढा बनवून पिणे. चहा किंवा पाण्यात तुळशीची पाने उकळून पिता येतात.
डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.