बारामती – जिल्हास्तरिय शालेय सायकलिंग स्पर्धामध्ये बारामतीच्या तनिश माळवे, उत्कर्ष गार्डी, अनुष्का राऊत यांनी विविध वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत आंबेगाव जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास पिंपळी शाळेचा विद्यार्थी तनिश शंकर माळवे याने १४ वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगावच्या उत्कर्ष गार्डी व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे, इग्लिश मेडिअम विद्यालयाच्या अनुष्का राऊत यांनी सतरा वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला.
विजेत्या स्पर्धकांची अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयर्नमॅन प्रशिक्षक सतिश ननवरे यांचे मार्गदर्शन तनिष्कला मिळाले. आयर्नमॅन मयूर आटोळे व बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.