बारामती: जेजुरी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर बारामती रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा अशी अपेक्षा बारामतीकरांची आहे. त्यासाठी मी खास प्रयत्न करत आहे. मात्र बारामतीत होणार्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचे डिझायनिंग हे बारामतीकरांनी करावं अशी अपेक्षा आहे. हे डिझाईनिंग बाहेरून न घेता स्थानिकांना संधी द्यावी अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली. त्या बारामतीतील रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या.