लाहोर : विशेष न्यायलयाने दिलेल्या निकालामुळे पाकिस्तानी लष्कराला खुप वेदना झाल्या आहेत,अशी भावना पाकिस्तानचे लष्करप्रमूख मेजर जनरल असीफ गफूर यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशी ठोठावल्यानंतर व्यक्त केली.
रावळपिंडी येथे लष्कराच्या अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांची रावळपिंडीत बैठक झाली. त्यानंतर लष्कर प्रमुखांनी निवेदन जारी केले. माजी लष्कर प्रमुख, सैन्य दलांचे प्रमुख देशाचचे राष्ट्रपती म्हणून मुशर्रफ यांनी देशाची 40 वर्ष सेवा केली. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी युध्द लढले ते नक्कीच देशद्रोही नसतात. विशेष न्यायलयाच्या उभारणी पासून कायदेशीर प्रक्रियेकडे डोळेझाक केलेली दिसत आहे.
स्वसंरक्षणाचा मुलभूत अधिकारही येथे नाकारण्यात आला आहे. व्यक्तीगत पातळीवर कामकाज उरकून घेत घाई करत निकाल देण्यात आला आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
पाकिस्तानच्या घटनेप्रमाणे न्याय केला जावा अशी पाकिस्तानच्या लष्कराची अपेक्षा आहे, असेही गफूर यांनी म्हटले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच माजी लष्करी अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मुशर्रफ हे सध्या दुबईत उपचार घेत आहेत. या महिन्याच्या सुरवातीला त्यांनी आपल्या बेडवरून एक व्हिडिओ पाठवला होता. त्यात देशद्रोहाचे हे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. यात माझी बाजू ऐकूनच घेतली नसल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला होता.