बंगळुरू : प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी प्रियशी आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपीला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली असून, १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीडित व्यक्तीला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दयावी, असेही न्यायालयाने या महिलेला सांगितले.
पीडित व्यक्तीसोबत महिलेचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत घरोबा केल्याने तिचा राग अनावर झाला. प्रियकराचा राग मनात धरून प्रियकराला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले. प्रियकर दंत रुग्णालयात बेशुद्ध झाल्यानंतर त्याचे गुप्तांग कापून टाकले.
प्रियकराने या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली असून नुकसान भरपाईसाठी २ लाख रुपये देण्यास सांगितले आहे. ही घटना २९ नोव्हेंबर २००८ रोजी घडली होती.