बारामती (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने बारामती शहर तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पेढे वाटून आनंद साजरा केला.
राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह शरद पवार गटाला मिळणार की अजित पवार गटाला याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. बारामतीकरांना देखील याची उत्सुकता होती.
अखेर अजित पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निर्णय झाल्यानंतर बारामतीत अजित पवार समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
पक्ष आणि चिन्ह ताब्यात आल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…..
ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, “आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.