बारामती -दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्रातील 38 शाळा शंभर नंबरी ठरल्या. यंदाही मुलींनी बाजी मारली असून बारामती केंद्राचा 98.39 टक्के निकाल जाहीर झाला आहे. बारामती केंद्रावर 5955 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 5 हजार 859 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ 96 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी यंदा विक्रमच प्रस्थापित केला आहे. अवघ्या 24 मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत. 72 मुले अनुत्तीर्ण झाले. बारामती केंद्रावरील 71 शाळांमधील 3139 मुले व 2816 मुलींनी ही परीक्षा दिली.
त्यापैकी 3067 मुले, तर 2792 मुली उत्तीर्ण झाल्या. यात मुलांच्या निकालाची 97.71 तर मुलींची टक्केवारी 99.15 टक्के इतकी आहे. मिशन हायस्कूल, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, आर. एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, आनंद विद्यालय होळ, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर, श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ, श्री विठ्ठल विद्यालय भिकोबानगर, न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती, लाटे, श्रीमती हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळी, शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर, न्यू इंग्लिश स्कूल मेखळी, विद्या प्रतिष्ठान मराठी विद्यालय, वसंतराव पवार विद्यालय देउळगाव रसाळ, श्री विठ्ठल विद्यालय कांबळेश्वर, सोमेश्वर आंबी बुद्रुक, न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी,
खांडेश्वरी खांडज, माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी, श्री. बी. एस. काकडे देशमुख निंबूत, श्री भैरवनाथ कोऱ्हाळे खुर्द, उर्दू विद्यालय बारामती, श्री भैरवनाथ मेडद, उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी, बाजीराव गावडे पाटील विद्यालय गुनवडी, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल बारामती, कवी मोरोपंत शिक्षण संस्था बारामती, विजय बाल विकास मंदिर बांदलवाडी, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी, श्री सिद्धेश्वर स्कूल कोऱ्हाळे बुद्रुक, राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल खंडूखैरेवाडी, अभिनव इंटरनॅशनल स्कूल प्रगतीनगर, सोमेश्वर स्कूल, शारदानिकेतन इंग्लिश स्कूल, शारदाबाई पवार विद्या निकेतन डे स्कूल, संत सावतामाळी स्कूल, सरस्वती विद्यालय, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल या तब्बल 38 शाळांचा निकाल शंभर टक्के जाहीर झाला आहे.