तळेगाव दाभाडे – येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयाने गेल्या सहा वर्षांची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
21 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण व द्वितीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयात निशा शिवाजी मराठे हिने 90.69 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती सतीश देशमुख हिने 87.60 टक्के गुणांसह द्वितीय व अक्षय पाडुरंग गुंडाळ याने 86.20 टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष संतोष दत्तात्रय खांडगे सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन केले.
कृष्णराव भेगडे स्कूलचा निकाल 100 टक्के
तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सिद्धी विजय रहातेकर हिने 93 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी दशरथ शिंदे हिला 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर श्रेया हनुमंत ढोरे हिने 91.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.पार्थ पराग कुंभार या विद्यार्थ्याला गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, मुख्याध्यापिका मीना अय्यर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
आंदर मावळात शाळांमध्ये मुलीचे वर्चस्व
टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील सर्व शाळातील दहावी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी वर्चस्व गाजविले. बहुतेक शाळांमध्ये पाहिल्या तीन क्रमांकामध्ये मुलींनी बाजी मारल्याचा निकालातून समोर आले आहे. निकाल पुढीलप्रमाणे – अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय (कंसात टक्केवारी) : न्यू इंग्लिश स्कूल (टाकवे बुद्रुक) 96.73 टक्के : साक्षी असवले आणि अनिकेत शिंदे (87.40), साक्षी साबळे (84.60), ओमकार जगताप (84.00). न्यू इग्लिश स्कूल (भोयरे) 89.61 टक्के : वैष्णवी तळावडे (93.64), आर्या गरुड (87.04), सूर्यकांत भोईकर (86.80). वरसुबाई माध्यमिक विद्यालय (माळेगाव खुर्द) 90 टक्के : दीपाली डामसे (69.60), रोहन सुपे (64.00), उत्तम अढारी (61.00). श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय (वहानगाव) 100 टक्के : रागिनी तुरडे (90.80), शुभम पिंगळे (90.60), सोनाली गोपाळे (86.80). बाळराजे असवले स्कूल (टाकवे बुद्रुक) 96.89 टक्के : साक्षी घुले (82.80), पूजा असवले (80.20), शलाका खांडभोर (79.80)
देहूरोडमध्ये शिवाजी विद्यालयाचे 92.85 टक्के
देहूरोड – येथील श्री शिवाजी विद्यालयातील 210 विद्यार्थ्यांपैकी 195 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल 92. 85 टक्के लागला आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाने 100 टक्के मिळवले आहे. विद्यालयाचे नाव, विद्यार्थ्यांनी मिळवलेले टक्के आणि अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पुढील प्रमाणे: श्री शिवाजी विद्यालय (देहूरोड) : अक्षयकुमार शरणबसप्पा जकापुरे (96.80), शुभम गुणवंत कांबळे (93.20), गायत्री सुभाष नावरकर (92.40). लायन्स क्लब (देहूरोड) : आदिती रवींद्र गायकवाड (91.00), श्रुती किसन भेगडे (90.40), करीना दशरथ चिंचकर (87.80). सेंट ज्यूड विद्यालय (देहूरोड) : तुलसी पाटील (93.20), रोमीसा पटेल (95.20), समर्थ काळोखे (92.20). सॅमसंग मेमोरियल रिपब्लिक विद्यालय : सानिका कुंडलिक पाडळकर (93.20), शाहिना असगरअली अन्सारी (86.80), सलोनी संजय बनसोडे (86.80). विस्डम विद्यालय (विकासनगर) : सायली संजय शेंडगे (91.80), जयलक्ष्मी राजेश नायडू (89.40), स्नेहल समाधान पाटील (89.00).
दहावीच्या परीक्षेत कार्ला परिसरातील मुलीच अव्वल
कार्ला – कार्ला परिसरातील एकूण तीन माध्यमिक शाळा असून, कार्ला येथील एकवीरा विद्या मंदिर शाळेचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम तीन क्रमांक हे मुलींनी या ठिकाणी बाजी मारली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक नेहा दत्तात्रय देवकर 91.60 टक्के, द्वितीय क्रमांक दिया विजय येवले 88.40 टक्के, तृतीय तेजल हरिश्चंद्र केदार 83.40 टक्के मार्क मिळवले.
भाजे येथील शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचा निकाल 98.40 टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक विभागून प्रियंका व मयुर देसाई 91.40 टक्के, द्वितीय क्रमांक प्रतीक नामदेव कडू 86.40 टक्के, तृतीय क्रमांक पूजा संजय चोरघे 83.80 टक्के गुण मिळवले. देवघर येथील स्व. वा. है. देशमुख माध्यमिक विद्यालयाचा निकाल 90.90 टक्के लागला. प्रथम क्रमांक – आरती संजय रोकडे 75.40 टक्के, द्वितीय क्रमांक मयुरी सखाराम आहेर 74.60 टक्के. तृतीय क्रमांक प्रथमेश विजय देशमुख 68.00 टक्के मार्क मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे एकवीरा विद्यालय मुख्याध्यापक शहाजी लाखे, शांतीदेवी गुप्ता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा क्षीरसागर, तर देवघर विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले.