बारामती – मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून बारामती शहरातील मुस्लीम समाजातील १५० छोट्या व्यावसायीकांना प्रत्येकी ३ लाख रुपये या प्रमाणे एकुण ४ कोटी ५० लाख रुपये कर्ज मंजुर झाले आहे. त्या कर्ज मंजुरी पत्राचे वाटप राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी दिली.
गुरुवार (१४ मार्च) रोजी सकाळी ८ वाजता शहरातील डेंगळे गार्डन येथे मुस्लीम समाज बांधवाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंजुरी पत्राचे वाटप करण्यात येणार असून शहरातील मुस्लिम बांधव व नागरिकांनी मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन अल्ताफ सय्यद यांनी केले आहे.