Rohit Pawar : महायुतीमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या रस्सीखेचामुळे अजित पवार गटामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे 22 आमदार हे शरद पवारांकडे परत येणार आहेत तर 12 आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे वाटत असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. । Rohit Pawar । Ajit Pawar | Sharad Pawar
जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होते. त्यांच्यामध्ये वाद होणार हे जवळपास निश्चित होते.
मात्र, आता त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील वाद वाढत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये मोठी खदखद असून यातील अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचा दावा आमदार पवार यांनी केला आहे. । Rohit Pawar । Ajit Pawar | Sharad Pawar
भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाणारा प्रत्येक नेता हा राजकीय दृष्ट्या संपतो. यासाठीच भारतीय जनता पक्ष अशा नेत्यांना जवळ करते. उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले त्यावेळेस अशी स्थिती निर्माण होईल असे वाटले होते. मात्र ही परिस्थिती इतक्या लवकर निर्माण होईल असे वाटले नव्हते, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना 9 जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना आता केवळ चार जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या घड्याळ या चिन्हावर एकही उमेदवार उभा राहणार नाही, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.