आयसीआयसीआय बॅंकेत चीनच्या बॅंकेची गुंतवणूक

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बॅंकेने नुकतेच संस्थागत गुंतवणूकदारांकडून 15 हजार कोटी रुपयांचे भांडवल जमा केले आहे. यातील 15 कोटी रुपयांचे शेअर पीपल्स बॅंक ऑफ चायनाने खरेदी केली असल्याचे वृत्त आहे.

अर्थात हे प्रमाण फारच कमी असले तरी सध्याच्या परिस्थितीत चीनच्या बॅंकेने ही गुंतवणूक केली आहे. बॅंक ऑफ चायनाने एचडीएफसी बॅंकेबरोबरच भारतातील इतर काही ब्ल्यू चीप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. याबाबत वृत्तसंस्थांनी बॅंकेकडे प्रतिक्रिया मागितली.

मात्र, ती उपलब्ध होऊ शकली नाही. सध्या भारत आणि चीन दरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. भारत सरकारने चीनच्या बऱ्याच ऍपवर बंदी घातली आहे. आत्मनिर्भर धोरण सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर या घडामोडींना महत्त्व आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.