“आरटीआय’द्वारे रिझर्व बॅंकेने दिली माहिती
नवी दिल्ली – गेल्या गेल्या 11 वर्षांमध्ये देशातील बॅंकांमध्ये तब्बल 50 हजारापेक्षा अधिक गैरव्यवहार झाले. यामध्ये आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बॅंकेयासारख्या आघाडीच्या बॅंकांमध्ये सर्वाधिक गैरव्यवहार झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून उपलब्ध झाली आहे. देशभरात 2008-09 ते 2018-19 या आर्थिक वर्षांदरम्यान एकूण 53,334 बॅंक गैरव्यवहार झाले. त्यामधून एकूण तब्बल 2.05 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. देशात कार्यरत असलेल्या काही विदेशी बॅंकांमध्येही गैरव्यवहार झाल्याची माहिती “आरबीआय’ने दिली आहे. माहिती अधिकार कायद्याखाली ही माहिती मागवण्यात आली होती.
देशभरातील व्यवसायिक बॅंकांमध्ये आणि निवडक वित्तीय संस्थांमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये गैरव्यवहाराची 6,801 प्रकरणे झाली असून त्यात 71,542.93 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे वृत्त 3 जून रोजी प्रसिद्ध झाले होते. देशभरातील बॅंकांमधील वाढत्या गैरव्यवहाराबाबत भाजप सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने दुसऱ्याच दिवशी केली होती.
आर्थिक वर्ष – गैरव्यवहार प्रकरणांची संख्या – गैरव्यवहारातील रक्कम
2008-09 – 4,372 प्रकरणे – 1,860.09 कोटी रुपये
2010-11 – 4,534 – 3,815.76 कोटी रुपये
2011-12 – 4,093 – 4,501.15 कोटी रुपये
2012-13 – 4,235 – 8,590.86 कोटी रुपये
2013-14 – 4,306 – 10,170.81 कोटी रुपये
2014-15 – 4,639 – 19,455.07 कोटी रुपये
2015-16 – 4,693 -18,692 कोटी रुपये
2016-17 – 5,076 – 23,933.85 कोटी रुपये
बॅंकेचे नाव – एकूण गैरव्यवहारांची संख्या – गैरव्यवहारांमधील रक्कम
आयसीआयसीआय बॅंक – 6,811 – 5,033.81 कोटी
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय)- 6,793 – 23,734.74 कोटी रुपये
एचडीएफसी बॅंक- 2,497 – 1,200.79 कोटी रुपये
बॅंक ऑफ बडोदा- 2,160 – 12,962.96 कोटी रुपये
पंजाब नॅशनल बॅंक – 2.047 – 28,700.74 कोटी रुपये
बॅंक ऑफ इंडिया- 1,872 – 12,358.2 कोटी रुपये
सिंडीकेट बॅंक – 1,783 – 5,830.85 कोटी रुपये
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया – 1,613 प्रकरणे – 9041.98 कोटी रुपये
आयडीबीआय बॅंक लि. – 1,264 – 5,978.96 कोटी रुपये
स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅंक- 1,263 – 1221.41 कोटी रुपये
कॅनरा बॅंक- 1,254 – 5,553.38 कोटी रुपये
युनियन बॅंक ऑफ इंडिया – 1,244 – 11,830.74 कोटी रुपये
कोटक महिंद्र – 1,213 – 430.46 कोटी रुपये
इंडियन ओव्हरसीज बॅंक – 1.115 – 12,644.7 कोटी रुपये
ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स – 1,040 – 5,598.23 कोटी रुपये
युनायटेड बॅंक ऑफ इंडिया – 944 – 3,052.34 कोटी रुपये
स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर – 395 – 742.31 कोटी रुपये
स्टेट बॅंक ऑफ पतियाळ – 386 – 1,187.77 कोटी रुपये
पंजाब ऍन्ड सिंध बॅंक – 276 – 1,154.89 कोटी रुपये
युको बॅंक -1,081 – 7,104.77 कोटी रुपये
तामिळनाड मर्कंटाईल बॅंक लि – 261 – 493.92 कोटी रुपये
लक्ष्मी विलास बॅंक लि – 259 – 862.64 कोटी रुपये
स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर – 274 – 694.61 कोटी रुपये
जम्मू ऍन्ड काश्मीर बॅंक लि – 142 – 1,639.9 कोटी रुपये
इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्प ऑफ इंडिया – 9 -671.66 कोटी रुपये
धनलक्ष्मी बॅंक लि. – 89 – 410.93 कोटी रुपये
विजया बॅंक – 639 – 1,748.9 कोटी रुपये
येस बॅंक लि – 102 – 311.96 कोटी रुपये
पेटीएम पेमेंट बॅंक लि – 2 – 2 लाख रुपये
विदेशी बॅंका
अमेरिकन एक्सप्रेस बॅंकिंग कॉर्पोरेशन – 1,862 – 86.21 कोटी रुपये
सिटी बॅंक- 1,764 – 578.09 कोटी रुपये
हॉंगकॉंग ऍन्ड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) – 1,173 – 312.1 कोटी रुपये
द रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड – 216 – 12.69 कोटी रुपये