पुणे : राष्ट्रभूषण चौकात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस खडक पोलिसांनी 12 तासात जेरबंद केले. अमित रविंद्र भाग्यवंत(35,रा.आंबेडकर नगर, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीला मद्याचे व्यसन असून पिण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात सांगितले आहे.
राष्ट्रभूषण चौकात 24 जूलै रोजी रात्री आठच्या सुमारास गरुड कॉम्पलेक्स येथील स्टेट बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये घूसुन मशिन उघडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपीने सीसीटीव्ही ही तोडून टाकले होते. याप्रकरणी बॅंकेच्यावतीने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना आरोपी भाग्यवंतने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तो नातुबाग चौकात आल्याची खबर मिळताच त्याला जेरबंद करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलिस कर्मचारी अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, रोहन खैरे, रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.