पाकमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशचा नकार

कराची : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात होणा-या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. मात्र टी-२० मालिका खेळण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

तसेच बांगलादेश बोर्डाने कसोटी मालिका न खेळण्याबदल अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे पाकिस्तान बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाकने त्रयस्थ ठिकाणी कसोटी खेळणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी म्हटले की, ” आम्ही बांगलादेश क्रिकेट बोर्डला कडक शब्दात पत्र लिहले असून कसोटी न खेळण्यासंदर्भात विचारले आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.