ढाका – अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाने आपले मालवाहू जहाज बांगलादेशात पाठवू नये, असे बांगलादेशाने म्हटले आहे. अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी बांगलादेशाने रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
“रशियाने आपला माल अमेरिकेकडून निर्बंध असलेल्या 69 जहाजातून पाठवू नये. त्याऐवजी अन्य नौकांमधून पाठवावा. असे आपण रशियाला कळवले आहे.’ असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल मोमेन यांनी पत्रकारांना सांगितले.
गेल्या महिन्यात रशियाच्या सहकार्यातून उबारण्यात येत असलेल्या बांगलादेशच्या रुप्पूर आण्विक प्रकल्पासाठी रशियाने काही उपकरणे आपल्या जहाजातून पाठवली होती. मात्र बांगलादेशने रशियाच्या जहाजावरील ही उपकरणे स्विकारण्यास नकार दिला होता. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने रशियाच्या 69 जहाजांवर निर्बंध जाहीर केले असल्यामुळे बांगलादेशाने या जहाजावरील उपकरणे स्विकारण्यास नकार दिला होता.
Brazil : ब्राझिलमध्ये ‘या’ कारणांमुळे वैद्यकीय आणीबाणी जाहीर
बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या जहाजाला बांगलादेशाने नांगर टाकण्यास नकार दिला होता. त्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाच्या जहाजांना न येण्याची सूचना केली.