ब्रासिलिया – ब्राझिलमधील यानोमामी प्रांतात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारने या प्रांतात वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आहे. या प्रांतात सोन्याच्या बेकायदेशीर खाण उद्योगामुळे इतर अनेक रोगही पसरले आहेत. या रोगराईमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय असल्यामुळे वैद्यकीय आणिबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानोमामी प्रांतातील आरोग्य यंत्रणा पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये खिळखिळी झाली होती. ही आरोग्य यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यासाठी ही वैद्यकीय आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे, असे सरकारी आदेशामध्ये म्हटले गेले आहे.
यानोमामी प्रांत हा व्हेनेझ्युएलाला लागून आहे. वैद्यकीय आणिबाणी लागू करण्यात आल्यामुळे आता या प्रांतात अन्नधान्याच्या पॅकेटचा पुरवठा करण्यात येणार आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी दुर्गम भागांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा वाढवण्यात येणार आहे.
US : रशियाचा वॅगनर ग्रुप अमेरिकेकडून गुन्हेगारी संघटना घोषित
यानोमामी प्रांतातील अतिदुर्गम भागांमध्ये सुमारे 26 हजार लोकांची वस्ती आहे. तेथे पर्जन्यमानाचे प्रमाण अतिशय जास्त आहे. याच भागांमध्ये सोन्याच्या बेकायदेशीर खाणींचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे.