मुंबई – आज विजयादशमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जन्मगाव असलेल्या दरे तांबसह 105 गाव व जावळी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी रवाना झालेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी साताऱ्यातून हजारो शिवसैनिक ट्रॅव्हल्स बस आणि खाजगी गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी साताऱ्यातले प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळख असलेले भगवान शेवडे हे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेत मुंबईकडे रवाना झाले.