Bajaj Auto Share Price: ऑटो सेक्टरमध्ये सध्या बरीच गती पहायला मिळत आहे. ऑटो सेक्टरशी संबंधित शेअर्सही खूपच आश्चर्यकारक दिसत आहेत. बजाज ऑटोमध्येही चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. बजाज ऑटोने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या परताव्याच्या माध्यमातून बजाज ऑटोच्या गुंतवणूकदांनी चांगला नफा कमावला आहे. आता तर बजार ऑटो स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तसेच शेअर्सचे भाव अवघ्या एका वर्षात दुप्पट झाले आहेत.
उत्कृष्ट तिमाही निकाल –
बजाज ऑटोचे आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल अलीकडेच समोर आले. यावेळी बजाज ऑटोने उत्कृष्ट निकाल सादर केले. ऑटो क्षेत्राच्या या शेअर्सच्या तिमाही नफ्यात 37 टक्क्यांनी वाढ झाली असून तिसऱ्या तिमाहीत हा नफा 37 टक्क्यांनी वाढून 2,042 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
शेअर 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर –
आता बजाज ऑटोचा शेअरही 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरने NSE वर 7874.20 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. यासोबतच त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 3625.60 रुपये आहे. केवळ एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी शेअरच्या किमतीत 40 रुपयांची वाढ दिसून आली आणि NSE वर शेअर 7824.95 रुपयांवर बंद झाला.
एका वर्षात दुप्पट परतावा –
बजाज ऑटोच्या शेअर्सनी केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये शेअरची किंमत 3800 रुपयांच्या आसपास होती पण आता शेअरची किंमत 7800 रुपयांच्या पुढे गेली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
(अस्वीकरण: हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे.)