Auto Sector share price: देशात अनेक क्षेत्रे आहेत ज्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे आणि ज्यामध्ये चांगली वाढही होताना दिसत आहे. या क्षेत्रांशी संबंधित विविध कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्धही आहेत. यामध्ये ऑटो क्षेत्राचाही समावेश आहे. कोरोना महामारीच्या काळात वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला आणि कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, आता वाहन क्षेत्र पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. वाहन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय, कंपन्याही चांगले तिमाही निकाल सादर करत आहेत.
आज आपण ऑटो सेक्टरच्या तीन महत्त्वच्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी वर्षभरात चांगले रिटर्न्स दिले आहेत. यापैकी दोन कंपन्यांनी जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे, तर एका कंपनीच्या शेअर्समध्ये 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बजाज ऑटो (Bajaj Auto)
बजाज ऑटोचा शेअर अवघ्या एका वर्षात दुप्पट झाला आहे. शेअर्सने वर्षभरात 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. NSE वर 2 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरची किंमत 7750 रुपये होती. शेअरने एका वर्षात 101 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे आणि 3900 रुपयांची वाढ दर्शविली आहे. NSE वर शेअरची 52 आठवड्यांची उच्च किंमत 7797.50 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 3625.60 रुपये आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी शेअरची किंमत सुमारे 3850 रुपये होती. तसेच आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत बजाज ऑटोच्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटा मोटर्स (Tata Motors) –
टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांचे तिमाही निकाल सादर केले आहेत, जे खूपच प्रभावी आहेत. टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात नेत्रदीपक 137 टक्के वाढ नोंदवली आहे. दरम्यान, टाटा मोटर्सचे शेअर्सही एका वर्षात जवळपास दुप्पट झाले आहेत. टाटा मोटर्सचे शेअर्स एका वर्षात जवळपास 100 टक्क्यांनी वाढले आहेत. NSE वर 2 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरची बंद किंमत 882.80 रुपये होती. तर 6 फेब्रुवारी 2023 रोजी शेअरची किंमत 442 रुपये होती. अशा स्थितीत वर्षभरात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 440 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. NSE वर टाटा मोटर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 900.15 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 400.45 रुपये आहे.
हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp)-
हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्येही गेल्या वर्षभरात चांगली वाढ झाली आहे. Hero MotoCorp शेअर्सनी केवळ एका वर्षात सुमारे 75 टक्के परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी, 6 फेब्रुवारी 2023 रोजी, शेअरची किंमत 2695 रुपये होती, जी 2 फेब्रुवारीला NSE वर 4709 रुपये झाली आहे. अशा स्थितीत अवघ्या एका वर्षात शेअरमध्ये 2014 रुपयांची वाढ दिसून आली आहे. NSE वर शेअरची 52 आठवड्यांची उच्च किंमत 4769.30 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 2246 रुपये आहे.
(टीप – हा गुंतवणूकाची सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधिन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)