Baipan Bhari Deva – ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.
सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल.
हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसला आहे. अश्यातच आता या चित्रपटाने जगभरात 91 कोटींची कमाई केली असून, त्यापैकी 76 कोटी एकट्या देशांतर्गत कमावले आहेत.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला IMDB ने 8.6 रेटिंग दिले आहे. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात नूतन आसगावकर, सुरुची आडारकर, सुचित्रा बेंडेकर आणि वरद चव्हाण यांसारखे दिग्गज मराठी कलाकार होते.
ज्यांच्यासोबत हा चित्रपट अवघ्या 5 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. पण कमाईचा विचार केला तर या चित्रपटाने खर्चापेक्षा 18 पट जास्त कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 91 कोटींची कमाई केली आहे.