पाणीपुरवठा कार्यालय तोडफोड प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांना जामीन

पुणे – स्वारगेट येथील महापालिका पाणी पुरवठा कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.

संग्राम सुभाष तळेकर, अतिश ज्ञानेश्‍वर झुरंगे, गणेश किशोर भोसले, श्रीकांत चंद्रकांत कर्णवर आणि अमेय प्रमोद सुतार अशी त्यांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. सतिश कांबळे, ऍड. अमेय बलकवडे आणि ऍड. आकाश ठक्कर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

या सर्वांवर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामाथ अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसानीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून 10 सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयीन कोठडीत असताना पाच जणंनी ऍड. सतिश कांबळे, ऍड. अमेल बलकवडे आणि ऍड. आकाश ठक्कर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावणे आणि तपास अधिकाऱ्याला सहकार्य करणे या अटीवर सर्वांना जामीन मंजुर करण्यात आलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.