मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये तिला जामीन मंजूर केला आहे. केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली होती.
केतकीवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली होती. तर पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायालाने सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.