पुणे – खडकवासला येथील सांगरुन गावाच्या हद्दीतील मुठा नदी पात्रात एका तरूणाचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात मुख्य आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश डी.वी.कश्यप यांनी जामीन मंजुर केला आहे. बाळू उर्फ बाळासाहेब भाऊ गजरे वय ( 32, रा. शिवणे ) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभिषेक हरगणे, ऍड. ओंकार फडारे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणात गजरे सह एकूण 6 आरोपी विरुद्ध खून करून पुरावा नष्ट करणे संदर्भात उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे ऑक्टोबर 2022 मध्ये गुन्हा दाखल आहे. अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून करणे, पुरावा नष्ट करणे व मयत इसमाची मृतदेह ट्रकच्या ट्रॉलीमध्ये भरून सांगरून गावाच्या हद्दीत एका चारीमध्ये टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गजरे याने ऍड अभिषेक हरगणे, ऍड ओंकार फडतरे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून हा निकाल झाला.