रॉटरडॅम – भारताच्या महिला हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत अमेरिकेचा पहिल्या सामन्यात 4-2 असा विजय मिळवला. या सामन्यात अमेरिकेच्या डॅनिएल ग्रेगाने 28 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताच्या दिप ग्रेस एक्काने 31 व्या मिनिटाला तर, नवनीत कौरने 32 व्या मिनिटाला व सोनिकाने 40 व्या मिनिटाला गोल फटकावत संघाला 3-1 असे आघाडीवर पोहोचवले.
अमेरिकेच्या नतालिआ कोनेर्थने 45 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात 3-2 अशी स्थिती निर्माण केली. यानंतर मात्र, भारताने वर्चस्व राखले. भारताच्या वंदना कटारियाने 50 व्या मिनिटाला मैदानी गोल करीत भारताची आघाडी 4-2 अशी केली व विजय साकार केला.