नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला अत्याधुनिक रिकव्हरी उपकरणाच्या तसेच अन्य अत्याधुनिक साहित्य खरेदीस सरकारने अखेर परवानगी दिली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) सिंधूला या उपकरणांच्या खरेदीसाठी मंजुरी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार 24 तासांच्या आत आवश्यक ती सर्व उपकरणे खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. साईने मात्र या उपकरणांच्या किमतीचा उल्लेख केला नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची अपेक्षा असलेल्या खेळाडूंमध्ये सिंधूचा समावेश होतो. उपकरणांच्या खरेदीस मान्यता मिळाल्याने सिंधू आनंदी आहे. हे विशेष उपकरण खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
खेळादरम्यान होणाऱ्या वेदना, सूज यापासून होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. टोकियो ऑलिम्पिकला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे.