माद्रीद – भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत पदकाची निश्चिती केली आहे. श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदरलॅंडचा मार्क क्लेजोऊवर 21-8, 21-7 अशी सरळ दोन गेममध्ये मात केली व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हा सामना केवळ 26 मिनिटे चालला व त्यात श्रीकांतने पदकाची निश्चिती केली आहे. प्रकाश पदुकोन व बी. साईप्रणीत यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा श्रीकांत तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.