मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारमधीलच एक भाग असणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली होती.
आज कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे सचिन तेंडूलकरच्या विराधोत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. त्यानुसार आजचे आंदोलन झाले.
सचिन ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी यापूर्वीही सचिन तेंडुलकरवर नाराजी व्यक्त केली होती.
मिळलेल्या माहितीनुसार, सचिन ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.”