करोना विषाणूमुळे काही कलाकार अद्यापही घराबाहेर पडण्याचे धाडस करत नसून त्यांनी शुटिंग सुरू केले नाही. दुसरीकडे अक्षय कुमार एका पोठोपाठ एक चित्रपट करत आहेत. अलीकडेच त्याने “बेलबॉटम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
View this post on Instagram
यानंतर आता त्याने “बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. साजिद नाडियाडवाला याच्या चित्रपटाचे जैसलमेर येथे शूटिंग सुरू झाले आहे. साजिद नाडियाडवाला, अरशद वारसी आणि कृती सॅनन हे जैसलमेर येथे आधिच विमानाने दाखल झाले होते.
View this post on Instagram
अक्षय कुमार आणि चित्रपटाचे अन्य कलाकार मंगळवारी जैसलमेरमध्ये दाखल झाले आणि आजपासून चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी हनुमान चौकात बसस्थानकाचा एक सेट उभारण्यात येथे काही सीन शूट करण्यात येत आहे.
View this post on Instagram
यावेळी अक्षय कुमार आणि कृति यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. जैसलमेर येथे “बच्चन पांडे’ची टीम दोन महिने शूटिंग करणार आहे. या चित्रपटातील नायिका कृती सॅनन ही जैसलमेरच्या रस्त्यावर दुचाकीवर फिरताना दिसली. याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. दरम्यान, “बच्चन पांडे’मध्ये अक्षय हा गॅंगस्टार, तर कृति सेनन ही पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. यात कॉमेडीसह जबरदस्त ऍक्शन सीन चाहत्यांना पाहण्यास मिळणार आहे.