बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने पत्नी दीपिका पदुकोणच्या वाढदिवशी खूपच क्युट शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने दीपिकाचा लहानपणीचा फोटो शेअर केला. त्यानंतर त्याने दीपिकासोबत एक रोमॅंटिक फोटो शेअर केला.
View this post on Instagram
या फोटोत दोघेही रोमॅंटिक पोझेस देताना दिसत आहेत. पहिल्या फोटोत रणवीरने लिहिले की, “मेरी जान, मेरी जिंदगी, मेरी गुडिया, हॅप्पी बर्थडे, दीपिका पदुकोण.’ यानंतर रोमॅंटिक फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “बिवी नंबर 1, दीपिका पदुकोण.’ दरम्यान, मंगळवारी रात्री दीपिकाने तिच्या घरी पार्टी दिली होती. ज्यात बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दीपिकाच्या बर्थडे पार्टीत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
याशिवाय करण जोहर आणि अनन्या पांडेसुद्धा दीपिकाच्या पार्टीत सहभागी झाले होते. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणने इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला पार केला आहे. इंडस्ट्रीमध्ये तिने एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानसमवेत “ओम शांती ओम’मधून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर दीपिकाने “लव आज कल’, “कॉकटेल’, “ये जवानी है दिवानी’, “चेन्नई एक्सप्रेस’, “पीकू’, “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्मावत’ यासह अनेक हिट चित्रपट दिले आहे.