लाहोर :- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वात जलद 10 हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो जागतिक कसोटी क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा बाबर पाकिस्तानचा 11 वा फलंदाज बनला आहे.
बाबरने 204 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद हा पल्ला गाठणारा बाबर हा आशियातील पहिलाच फलंदाज ठरला.
सर्वात कमी डावात ही कामगिरी करत त्याने सर व्हिवीयन रिचर्डस, हाशिम आमला, ब्रायन लारा आणि ज्यो रूट यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज बनण्याची कामगिरी केली आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा 232 डावांत ही कामगिरी करण्याचा विक्रम मागे टाकला असून त्याने 228 व्या डावात ही कामगिरी केली.