सोलापूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची आजची अंतिम तारीख असून आज राज्यभरातील अनेक प्रमुख नेतेमंडळी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बबनदादा शिंदे यांना यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीतर्फे उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बबनदादा शिंदे यांनी सलग पाच वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.