नवी दिल्ली – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्यासोबत योगगुरू बाबा रामदेव हे देखील उपस्थित झाले आहे. होते. यावेळी बाबा रामदेव यांनी अमित शाह यांच्या फिटनेसचं सिक्रेट सांगितलं आहे.
गुरुवारी पतंजली योगपीठात आयोजित केलेल्या संन्यास दीक्षा समारंभात आलेले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे कौतुक करताना योगगुरू स्वामी रामदेव यांनी ही माहिती दिली. रामदेव बाबा म्हणाले की, ‘गृहमंत्री रोज योग आणि प्राणायाम करतात. यामुळे त्याने 30 किलो वजन कमी केले आहे. हे सर्वांसाठी एक उदाहरण आहे. एवढी व्यस्त असलेली व्यक्ती जेव्हा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करू शकते, तेव्हा प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगा आणि प्राणायामाचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून आपण निरोगी राहू शकू. सनातनच्या वैभवाबद्दल बोलणारा आणि गुलामगिरीच्या खुणा दूर करणारा कोणी मोठा योद्धा असेल तर ते अमित शहा आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.
स्वामी रामदेव म्हणाले की, संतांसोबतच सर्वसामान्यांनीही सनातन संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करा. सनातन धर्माची पताका जगभर फडकवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हे स्वतः करा आणि इतरांनाही ते करण्यास प्रेरित करा.