मुंबई – अभिनेता आयुष्मान खुरानाची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करून त्यांनी बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.
तसेच या आयुष्मानने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले. आयुष्मानने ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’, ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता आयुष्मानने खुलासा केला आहे की, त्याला मराठी चित्रपट आवडतात आणि त्यातही नागराज मंजुळे यांचे चित्रपट त्याला आवडतात.’
एक वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मराठी चित्रपटांची आवड असल्याचे सांगितले, या मुलाखती दरम्यान तो म्हणाला,’मी मराठी चित्रपट पाहतो. नागराज मंजुळेचे चित्रपट मला आवडतात. हे चित्रपट मातीशी जोडलेले असतात. आपल्या समाजावर ते चित्रपट भाष्य करतात. मला मराठी समजतं पण बोलता येत नाही.’ असेही तो या मुलाखती दरम्यान म्हणाला आहे.
चित्रपट निर्माता होण्याबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, ‘जर तुम्ही खूप चित्रपट बघितले तर तुम्हाला चित्रपटांबद्दल बरेच ज्ञान असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते बनवू शकता.’ आयुष्मानच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.