मुंबई – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण झाले असून आता लवकरच ‘घर बंदूक बिर्याणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
सध्या नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदुक बिर्याणी’ या चित्रपटाचा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच या चित्रपटाच्या चर्चेसोबत त्यांच्या कुटुंबाचीही चर्चा चांगलीच होत आहे. ‘घर बंदुक बिरयानी’ च्या प्रमोशनदरम्यान नागराज अण्णांनी पहिल्यांदाच पत्नी आणि मुलाची ओळख करुन दिली. नागराज मंजुळे यांच्या पत्नीचं नाव गार्गी तर लेकाचं नाव राया असं आहे.
सिनेमाच्या प्रमोशनला एके ठिकाणी नागराज मंजुळे यांनी कुटूंबासह हजेरी लावली आणि कुटुंबाची ओळखही करुन दिली. त्यांच्या पत्नी गार्गी या सिनेनिर्मात्या आहेत. नागराज मंजुळेंच्या आटपाड प्रोडक्शन हाऊसचं काम त्या स्वत: पाहतात. तर त्यांचा मुलगा राया याने ‘घर बंदुक बिरयानी’ मध्ये छोटीशी भूमिका साकारली आहे.