नवी दिल्ली – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. या निकालाचे वाचन सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्यासह देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.
या प्रकरणी पाच ऑगस्टपासून नियमित सुनावणी सुरु होती. ही सुनावणी 16 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली.
दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्याने तत्पूर्वी हा निकाल येणे निश्चित होते.
त्यानुसार, आता उद्या यावर अंतिम निकाल येणार आहे. हा निकाल सकाळी साडेदहा वाजता सुनाविण्यात येण्याची शक्यता आहे.