वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीजवळील वडजाई येथे गुरुवारी (दि.११) दुपारी एक दुर्मिळ घटना घडली असून दुग्ध व्यावसायिक चिबू सातव यांच्या मुर्रा जातीच्या म्हशीने दोन तोंडासह सहा पाय व दोन शेपटी असलेल्या वासरला जन्म दिला.
मात्र काही क्षणातच हे वासरू मृत पावले, पण जन्मदाती म्हैस सुखरूप आहे. वाघोलीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल चमरे यांनी या म्हशीची सिजेरियन ऐवजी नैसर्गिक प्रसूती केली असून अथक प्रयत्नानंतर पारडू म्हशीच्या गर्भाशयातून सुरक्षितरित्या बाहेर आले आहे.
प्रसूतीनंतर म्हशीचा चारापाणी व्यवस्थित चालू असून अशी दुर्मिळ घटना माझ्या कारकिर्दीमध्ये २० वर्षापूर्वी घडली होती. आज पुन्हा दोन तोंडाचे पारडू जन्माला आले असल्याची घटना घडली असल्याचे डॉ. चमरे यांनी सांगितले