पुणे – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ‘करोना व्हायरस’चा वाढता प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्वप्रकारची सार्वजनिक स्थळं, शाळा- कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूंच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यानी देखील कोरोनावर गाण्यातून जनजागृती केली आहे. या गाण्यातून त्यांनी समाजातील वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.