पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने पावसाळ्यात होणारे विविध आजारांविषयी घेण्याची काळजी याबाबत जागृती करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाइन व बाहेरगावातून आलेल्या नागरिकांना ताबडतोब क्वारंटाइन होणेकरिता माहिती देण्यात आली.
पावसाळा सुरू होत असून या काळात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. हे आजार टाळण्यासाठी सात दिवसांतून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा. गावात घाणीचे साम्राज्य होणार नाही यासाठी योग्य काळजी घेण्यात यावी.
बॅंक, शाळा, ग्रामपंचायत बिलिंडग स्लॅबवरती पावसाळ्यात पाणी साचणार नाही. याची काळजी घ्यावी. पाण्याची योग्य ते विल्हेवाट लावण्यात यावी. डासांची पैदास होऊ नये, यासाठी रस्त्यावर डबकी साचून देऊ नये. औषधांची फवारणी करण्यात यावी. आरोग्यविषयी माहिती आरोग्य सहाय्यक अनिल तोडकरी यांनी दिली.
यावेळी सरपंच बबन ढोबळे, दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे, आरोग्यसेविका सारिका पडवळ, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, नामदेव पुंडे, आदी उपस्थित होते.