बॉलीवूडमध्ये “धडक’ एन्ट्री करणाऱ्या जान्हवी कपूरने आता बाळाची इच्छा असल्याचे सोशल मीडियावर बेधडक भाष्य केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या कॅप्शनमधील या ओळीने तिच्या चाहत्यांना कन्फ्युज केले आहे.
बॉलीवूडचे प्रसिद्ध प्रोड्युसर बोनी कपूर आणि बॉलीवूडवर एकेकाळी राज केलेली अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. करोना संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात राहून आपल्या कुटुंबासोबत सध्या ती वेळ घालवत आहे. सध्या जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट टाकली आहे की- “यहां तुमको देख रही हूं, बच्चा’ त्याचबरोबर आपल्या सुंदर फोटो पोस्ट करून या ओळीने तिचे चाहते कन्फ्युज झाले आहेत.
जान्हवीच्या या पोस्टवर डायरेक्टर राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषाने लिहिले की- “कौन बच्चा? क्या तुम बच्चा चाहती हो’ यावर जान्हवीने उत्तर दिले- “हॉं’ सोशल मीडियावर या दोन्ही मैत्रिणींमधील हा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्यातील संवादामुळे मात्र चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगत आहेत. यावर अनेक चाहते जान्हवीला चांगल्या प्रतिक्रियाही देत आहेत.