कार्ला – करोनाविषयी जनजागृती करणारी सामाजिक संदेश देणारी “यस वूई कॅन’ शॉर्ट फिल्म पुणे व मावळातील कलाकारांनी प्रसारित केली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हा लघुपट सर्व कलाकारांनी घरीच मोबाइलवर शूट करण्यात आला आहे.
आपापल्या घरी राहून पूर्ण केला आहे. तसेच मावळमधील पिंपळोली या गावातील कलावंत संतोष बोंबले यानी या लघुपटामध्ये भूमिका साकारली आहे. या आधी नाटक चित्रपट शॉर्ट फिल्ममध्ये आपल्या अभिनयाची चुणूकदाखवली आहे. आपल्या पुण्याच्या टीमला घेऊन शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून करोनाविषयी सामाजिक जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम यामाध्यमातून केले आहे.
संपूर्ण देश करोनाच्या विळख्यात सापडला असताना त्याचा परिणाम उद्योग धंद्यावर झाला आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपणास कशा रितीने प्रयत्न केले पाहिजे. छोटे-मोठे उद्योगाला चालना मिळण्यासाठी आपण कशा रितिने पाऊल उचलायला हवे, असा योग्य संदेश देण्याचे काम या शार्ट फिल्मने केले आहे. याची कथा-संकल्पना- संगीत-दिग्दर्शन सचिन गायकवाड याने केले. तर खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांनी ही यामध्ये अभिनय केला आहे. यामध्ये संतोष बोंबले, सचिन गायकवाड, दिनेश नेरुणे, सूर्यकांत गुरव, अनिल गायकवाड, हृषिकेश पुटगे, विक्रम राऊत अभिनय केला आहे.