बॉक्‍स ऑफिसवर “अव्हेंजर्स एंडगेम’चे उत्पन्न रेकॉर्ड

मार्वल एन्टरटेनमेंटच्या “अव्हेंजर्स एंडगेम’ने बॉक्‍स ऑफिसवर तुफान कमाई करायला सुरूवात केली आहे. भारतातल्या थिएटर आणि मल्टीप्लेक्‍समध्ये हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा उलटला आहे. पण कित्येक ठिकाणी याचे बहुतेक शो “हाऊसफुल्ल’चालले आहेत. “अव्हेंजर्स’चा पहिला भाग तुफान ऍक्‍शननी भरला होता. तर दुसरा भाग तितकाच इमोशनल आहे. सध्या भारतातील उत्पन्नाचे आकडे बघता हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या पुढे जाईल. आणि एकूणच या सिनेमाची कमाई 500 कोटींच्याही पुढे जाऊ शकते. भारतामध्ये 100 कोटी रुपयांची कमाई सर्वात कमी वेळामध्ये करण्याचे रेकॉर्ड आता “अव्हेंजर्स एंडगेम’च्या नावावर जमा झाले आहे. केवळ 3 दिवसातच या सिनेमाने 150कोटीम्ची कमाई देखील केली आहे. सोमवारी 31 कोटी 5 लाख, मंगळवारी 26 कोटी 10 लाख, बुधवारी 28 कोटी 50 लाख, आणि गुरुवारी 16 कोटी 10 लाख रुपयांची कमाई या सिनेमाने करून दाखवली होती. शुक्रवारी 18 कोटी रुपयांची कमाई करून या सिनेमाने आठवड्याभरातच 278 कोटींची कमाई केली. आतापर्यंतचा सर्वात जास्त लांबीचा सिनेमा ठरलेला “अव्हेंजर्स…’एकूण किती कमाई करतो याबाबत आत उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.