टेनिस स्पर्धा : स्निग्धा, सरावाणी, प्रियम, श्रीनिधीची मुख्य फेरीत धडक

फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा

पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000 डॉलर पारितोषिक रकमेच्या फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत स्निग्धा बाला आगम, सरावाणी चिंतलापल्ली, प्रियम कुमारी, श्रीनिधी श्रीधर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत स्निग्धा बाला आगम हिने आलयका इब्राहिमचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली.

चुरशीच्या झालेल्या लढतीत सरावाणी चिंतलापल्लीने रूपकथा मुखर्जीचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 2-6, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना तीन तास चालला. प्रियम कुमारी हिने प्रगती सोलणकरवर 6-4, 6-1 असा विजय मिळवला. श्रीनिधी श्रीधरने प्रगती नारायणनचा 6-2, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेत मुख्य फेरीसाठी वैदेही चौधरी, युब्रानी बॅनर्जी, आलिया इब्राहिम आणि बेला ताम्हणकर यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे स्पर्धेचे संचालक नवनाथ शेटे यांनी सांगितले.

सविस्तर निकाल : अंतिम पात्रता फेरी:

स्निग्धा बाला आगम (भारत) वि.वि. आलयका इब्राहिम (भारत) 6-1, 6-2; प्रियम कुमारी (भारत) वि.वि. प्रगती सोलणकर (भारत) 6-4, 6-1; सरावाणी चिंतलापल्ली (भारत) वि.वि.रूपकथा मुखर्जी (भारत) 7-6(6), 2-6, 6-3; श्रीनिधी श्रीधर (भारत) वि.वि. प्रगती नारायणन (भारत) 6-2, 6-1.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.