बॉलिवूडमध्ये राजकीय नेत्यांवरील बायोपिकचा ट्रेन्ड लक्षात घेता रोज नवनवीन नेत्यांच्या बायोपिकच्या घोषणा व्हायला लागल्या आहेत.मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, जयललिता यांच्या बायोपिकनंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. हा योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक आहे, असे म्हणण्यापेक्षा या सिनेमातील लीड रोल योगी आदित्यनाथ यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळता जुळताच असेल, असे म्हणणे जास्त योग्य असेल. या सिनेमातल्या योगी आदित्यनाथ यांच्या रोलमध्ये कुमुद मिश्रा काम करणार आहेत. कुमुद मिश्रा हे ज्येष्ठ कलाकार आहेत आणि त्यांनी यापूर्वी “रॉकस्टार’ आणि “जॉली एलएलबी’सारख्या सिनेमांमध्ये महत्वाचा रोल यापूर्वी केला होता. उत्तर प्रदेशातल्या बनारस शहरात राहणाऱ्या आणि कोणताही धर्म न मानणाऱ्या एका मुस्लिम मूर्तीकाराची ही कथा आहे. यामध्ये कुमुद मिश्रा बनारस शहरातील एका स्थानिक नेत्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या रोलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय कारकिर्दीची एक झलक बघायला मिळणार आहे. यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांच्यावरच्या एका बायोपिकची घोषणा झाली होती. पण हातात बंदूक घेतलेला साधूच्यावेषातील नेत्याच्या पोस्टरमुळे त्याला भाजपनेच विरोध केला होता.