राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांचा राजीनामा

मुंबई- श्रीवर्धनचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे तटकरे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

अवधूत तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल होणार अशी चर्चा होती. त्या चर्चेला पूर्णविराम देत आज दुपारी श्रीवर्धनमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या अवधूत तटकरे यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला आहे.

या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी आणि तटकरे कुटुंबियांसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

येत्या दोन दिवसांत आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मातोश्रीवर जाऊन अवधूत तटकरे आपल्या हातावरील घड्याळ काढून शिवबंधन बांधून घेतली आणि शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतील असेही सूत्रांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×