#AUSvNZ : दुस-या दिवसअखेर न्यूझीलंड ५ बाद १०९

पर्थ : न्यूझीलंडविरूध्द पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडची पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर ३२ षटकात ५ बाद १०९ अशी बिकट अवस्था झाली आहे. न्यूझीलंड अजूनही ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

न्यूझीलंडची पहिल्या डावाची सुरूवात फारच खराब झाली. संघाची धावसंख्या १ असताना दोन्हीही सलामीवीर माघारी परतले. जीत रावलला १ धावेवर जोश हेझलवूड त्रिफळाचित तर टाॅम लाथम याला शून्यावर मिशेल स्टार्क याने झेलबाद केले. त्यानंतर विलियमसनने टेलरच्या साथीनं काही काळ डाव सावरत तिस-या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. विलियमसन ३४ धावांवर असताना स्टार्कने स्मिथकरवी त्याला झेलबाद केलं.

त्यानंतर स्टार्कने आपला प्रभावी मारा कायम ठेवत हेनरी निकोल्सला ७ आणि नील वैगनरला शून्यावर बाद करत न्यूझीलंडची ५ बाद ९७ अशी अवस्था केली. त्यानंतर राॅस टेलरने संयमी करत खेळ करत आणखी पडझड होऊ दिली नाही आणि दुस-या दिवसअखेर न्यूझीलंडने ५ बाद १०९ अशी मजल मारली.

दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बीजे वाॅटलिंग 0 आणि राॅस टेलर ६६ धावावर खेळत होता. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने ११ षटकात ३१ धावा देत ४ तर जोश हेझलवूडने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियानं पहिल्या डावात मार्नस लबुशेनच्या १४३ आणि ट्रैविस हेडच्या ५६ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साउदी आणि नील वैगनर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. काॅलिन डी ग्रैंडहोम आणि जीत रावलने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.