पुणे विद्यापीठात काढली मुलीची छेड; एक जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवे आला आहे. विद्यापीठात शिक्षण घेणारी विद्यार्थीनी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पोस्ट ऑफिस जवळून वसतीगृहाच्या दिशेने जात होती. त्यावेळी एकजण तेथे येऊन तिची छेड काढली. सखाराम त्र्यंबक वर्पे (सध्या रा. बोपोडी, मुळ रा. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

घाबरलेल्या या विद्यार्थीनीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून जाऊ लागला. मुलीचा आवाज ऐकल्याने जवळच असलेल्या सुरक्षारक्षकाने पोस्ट ऑफिसच्या दिशेने धाव घेतली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

वायरलेसवरून या घटनेची माहिती देऊन पेट्रोलिंग जीपला बोलविण्यात आले. आरोपी एलिस उद्यानात लपल्याचे कळाले. सुमारे सात ते आठ सुरक्षा रक्षकांनी सर्च लाईटच्या मदतीने त्याला झुडपातून पकडले. त्याला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.